जमैका - वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने भारताविरुध्दच्या तीन दिवसीय सराव सामन्यासाठी १४ सदस्यीय 'अ' संघ जाहीर केला आहे. बोर्डाने या संघात डॅरेन ब्राव्हो आणि जॉन कॅम्प्बेल यांना संधी दिली आहे. दरम्यान, वेस्ट इंडीज विरुध्द भारत या संघात दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार असून यांची सुरुवात २२ ऑगस्टपासून होणार आहे. या मालिकेपूर्वी सराव सामना खेळवण्यात येणार आहे.
भारत विरुध्दच्या सराव सामन्यासाठी विंडीजचा संघ जाहीर, ब्राव्हो, कॅम्प्बेल संघात
वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने भारताविरुध्दच्या तीन दिवसीय सराव सामन्यासाठी १४ सदस्यीय 'अ' संघ जाहीर केला आहे. बोर्डाने या संघात डॅरेन ब्राव्हो आणि जॉन कॅम्प्बेल यांना संधी दिली आहे. दरम्यान, वेस्ट इंडीज विरुध्द भारत या संघात दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार असून यांची सुरुवात २२ ऑगस्टपासून होणार आहे.
अँटिग्वा येथे भारत विरुध्द वेस्ट इंडीज संघातील पहिला कसोटी सामना २२ ऑगस्ट पासून खेळवण्यात येणार आहे. तत्पूर्वी एक तीन दिवसीय सराव सामना खेळवण्यात येणार आहे. यासाठी विंडीज बोर्डाने आपला १४ सदस्यीस संघ जाहीर केला. मात्र, सराव सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे. विराटला तिसऱ्या व अखेरच्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. या कारणाने विराटला विश्रांती देण्यात येऊ शकते.
वेस्ट इंडीजचा अ संघ -
जॅहमर हॅमिल्टन ( कर्णधार), डॅरेन ब्राव्हो, जॉन कॅम्प्बेल, किओन हार्डिंग, रोमारिओ शेफर्ड, काव्हेम हॉड्ज, जॉनथन कार्टर, अकिम फ्रेजर, ब्रँडन किंग, जेसन मोहम्मद, मार्क्युनो मिंडली, खॅरी पिएर, रोव्हमन पॉवेल, जेरेमी सोलोझानो.