नवी दिल्ली -माजी भारतीय क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराजसिंगचे कौतुक केले आहे. लक्ष्मण सध्या ट्विटरवर दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंचे फोटो पोस्ट करत असून तो आपली प्रतिक्रिया देत आहे. युवराजने कर्करोगासारख्या आजाराशी झुंज देऊन 2011 मध्ये भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. युवराजची या स्पर्धेत 'मालिकावीर' म्हणून निवड झाली होती.
युवराजचा ट्विटरवर फोटो पोस्ट करत लक्ष्मण म्हणाला, "कर्करोगावर मात करून अनेकांचे प्रेरणास्थान बनलेल्या युवराजसिंगने 2011 वर्ल्ड कपमध्ये आजारी असूनही संघांची जबाबदारी खांद्यावर घेतली. आजारातून बरे झाल्यानंतरही त्याने एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट धावा केल्या. हे त्याच्या अतूट धैर्याचे प्रतिक आहे."