हैदराबाद -भारतामध्ये क्रिकेट या खेळाला खूप महत्त्व आहे. क्रिकेटला सर्वस्व मानणारे अनेक लोकं या क्षेत्रात मोठे झाले. क्रिकेटला एक करियर म्हणून पाहण्यासाठी अनेकजण लहान वयातच सरावाला सुरूवात करतात. गुणवत्ता असलेल्या लहान मुलांचे क्रिकेट खेळतानाचे व्हिडिओ आपण नेहमीच पाहत असतो. आता असाच एक व्हिडिओ आपल्या समोर आला आहे. या व्हिडिओची दखल भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस. लक्ष्मणने घेतली आहे.
अपंग मुलाच्या गोलंदाजीने लक्ष्मण प्रभावित..पाहा व्हिडिओ - handicapped bowling laxman news
एका अपंग मुलाचा व्हिडिओ लक्ष्मणने आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये असलेल्या या मुलाला अर्धे हात नाहीत, परंतु तो डाव्या हाताने गोलंदाजी करत आहे.
अपंग मुलाच्या गोलंदाजीने लक्ष्मण प्रभावित..पाहा व्हिडिओ
एका अपंग मुलाचा व्हिडिओ लक्ष्मणने आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये असलेल्या या मुलाला अर्धे हात नाहीत, परंतु तो डाव्या हाताने गोलंदाजी करत आहे.
लक्ष्मण या मुलाला पाहून फार प्रभावित झाला आहे. "माणसाची आवड ही एक क्षमता, चिकाटी, हिंमत, कोणीही चोरी करू शकत नाही अशी गोष्ट आहे. माणसाच्या संयम आणि धैर्याला सलाम", असे लक्ष्मणने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.