नवी दिल्ली -भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने माजी कर्णधार सौरव गांगुलीचे कौतुक केले आहे. गांगुली मोकळेपणाने खेळायचा, असे लक्ष्मणने सांगितले. लक्ष्मणने मंगळवारी गांगुलीचा नॅटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यादरम्यानचा एक फोटो शेअर केला.
"अभिमान वाटावा असा माणूस. सौरव गांगुली मोकळेपणाने खेळणारा माणूस होता. शक्तिशाली युवा खेळाडू जे पुढे जाऊन चांगले खेळले त्यांचे श्रेय गांगुलीच्या नेतृत्त्वाला दिले जाते'', असे लक्ष्मणने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.