नवी दिल्ली -माजी भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराचे कौतुक केले आहे. नेहराने दुखापतींशी झुंज देत पुनरागमन केले आणि मर्यादित षटकाच्या क्रिकेटसाठी तो संघाचा महत्त्वाचा भाग झाला, असे लक्ष्मणने म्हटले आहे. लक्ष्मण सध्या ट्विटरवर दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंचे फोटो पोस्ट करत असून तो आपली प्रतिक्रिया देत आहे.
लक्ष्मणने ट्विटमध्ये म्हटले, ''नाजूक शरीरामुळे नेहराची कारकीर्द कमी होती. पण त्याने दुखापतींवर मात करत पुनरागमन केले. या गोष्टीचा सन्मान म्हणून त्याला 2011चे वर्ल्डकप पदक आणि 38व्या वर्षांत भव्य निरोप देण्यात आला.''