मुंबई -माजी भारतीय क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण मेहनत करणाऱ्या लोकांचे नेहमीच कौतुक करत असतो. अशा लोकांसाठी लक्ष्मणने पुढाकार घेतलेलला आढळून आला आहे. दरम्यान, लक्ष्मणने एका व्यक्तीचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. मुंबईतील रस्त्यावर खड्डे भरणाऱ्या व्यक्तीचे लक्ष्मणने कौतुक केले आहे. रस्त्यातील खड्ड्यामुळे झालेल्या एका अपघातात या व्यक्तीने आपला मुलगा गमावला होता.
मुलगा गमावलेल्या बापाचे काम पाहून लक्ष्मण भारावला! - laxman on dadarao bilhore
2015 मध्ये दादाराव बिलहोरे यांनी आपला 16 वर्षाचा मुलगा गमावला होता. एकुलत्या एका मुलाच्या निधनानंतर दादारावांनी रस्त्यातील खड्डे भरण्यास सुरुवात केली. "आपल्या 16 वर्षाच्या मुलाला गामवल्यापासून दादाराव बिलहोरे मुंबईतील रस्त्यावरील खड्डे भरत आहेत. दु:खामुळे ते मनातून हरले होते, तरीही ते हातात दगड, फावडे घेऊन प्रत्येक खड्डा भरतात", असे लक्ष्मणने ट्विटरवर म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी, एका अपंग मुलाचा व्हिडिओ लक्ष्मणने आपल्या ट्विटरवर शेअर केला होता. व्हिडिओमध्ये असलेल्या या मुलाला अर्धे हात नाहीत, परंतु तो डाव्या हाताने गोलंदाजी करत होता. लक्ष्मण या मुलाला पाहून फार प्रभावित झाला. "माणसाची आवड ही एक क्षमता, चिकाटी, हिंमत, कोणीही चोरी करू शकत नाही अशी गोष्ट आहे. माणसाच्या संयम आणि धैर्याला सलाम", असे लक्ष्मणने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले होता.