महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL Auction २०२० : पॅट कमिन्स ठरला सर्वात महागडा खेळाडू; 15 कोटी 50 लाखांची मिळाली किंमत

इंडियन प्रीमियर लीग (आईपीएल) २०२० मधील हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव संपला आहे.

vivo ipl 2020 players auction live streaming updates
IPL Auction २०२० : थोड्याच वेळात लिलावाला सुरूवात...

By

Published : Dec 19, 2019, 2:41 PM IST

Updated : Dec 19, 2019, 10:14 PM IST

कोलकाता- इंडियन प्रीमियर लीग (आईपीएल) २०२० मधील हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव संपला आहे. कोलकातामध्ये झालेल्या या लिलावासाठी ९७१ खेळाडूंनी नोंदणी केली होती. यातील ३३२ खेळाडूंना बीसीसीआयने निवडले होते. मात्र, गुरुवारी या यादीत आणखी सहा खेळाडूंची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. यामुळे ३३२ ऐवजी ३३८ खेळाडूंवर बोली लागली.

पॅट कमिन्स

पहिला टप्पा -

पहिल्या टप्प्यात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूवर विक्रमी बोली लागली. फ्रेंचाईझींनी पॅट कमिन्स आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांना १० कोटींहून अधिक रक्कमेवर बोली लावली. पहिल्या टप्प्यात दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसलाही १० कोटींच्या वरची बोली लागली. युसूफ पठाण, कॉलिन डी ग्रँडहोम, चेतेश्वर पुजारा यांसारख्या खेळाडूंना कोणत्याही फ्रेंचायझीने बोली लावली नाही.

दुसरा टप्पा -

दुसऱ्या टप्प्यात अनेक खेळाडू अनसोल्ड राहिले. यात पाच यष्टिरक्षक आणि पाच गोलंदाजांचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे, डेल स्टेन टीम साऊथीही अनसोल्ड ठरला. पण, फिरकीपटू पियुष चावलाला ६ कोटी ७५ लाखांच्या बोलीसह चेन्नईने विकत घेतले. तर वेस्ट इंडीजचा शेल्डन कॉट्रेलवर विक्रमी बोली लागली.

LIVE UPDATE :

  • दक्षिण आफ्रिकन जलदगती गोलंदाज डेल स्टेनला रॉयल चॅलेंजरर्स बंगळुरूने 2 कोटीत खरेदी केले.
  • इंग्लंडचा जलदगती गोलंदाज क्रिस जॉर्डनला किंग्स इलेवन पंजाबने 3 कोटी रुपये देऊन संघात सामील करून घेतले. त्याची बेस प्राईस फक्त 75 लाख रुपये होती.
  • 48 वर्षीय खेळाडू प्रवीण तांबे याला कोलकाता नाइट राइडर्सने 20 लाखात खरेदी केले.
  • बेस प्राईजला विकले गेले हे खेळाडू : क्रिस ग्रीनला केकेआर ने 20 लाखात, जोशुआ फिलिपला आरसीबीने 20 लाखात, मोहसिन खानला मुंबईने 20 लाखात खरेदी केले.
  • अनसोल्ड : मार्क वूड, अल्झारी जोसेफ, मुस्तफिजूर रहमान, बरिंदर सरन, अ‍ॅडम मिल्न, अँडिल फेलुक्वायो, बेन कटिंग, ऋषी धवन, आणि एन्रिच नॉर्चे
  • जोश हेजलवूडला चेन्नई संघात, २ कोटींच्या बोलीवर चेन्नईनं घेतल संघात
  • जिमी निशम ५० लाखांच्या बोलीवर पंजाब संघात
  • मिचेल मार्श : २ कोटीच्या बोलीवर हैदराबाद संघात
  • अनसोल्ड : मनोज तिवारी, कॉलिन इनग्राम, मार्टिन गप्टिल, कार्लोस ब्रेथवेट, मार्कस स्टोयनीस, कॉलिन मुनरो
  • सौरभ तिवारी : ५० लाखांच्या बोलीवर मुंबई संघात
  • डेव्हिड मिलर राजस्थान रॉयल्समध्ये, ७५ लाखांची लागली बोली
  • शेमरॉन हेटमायर : ७ कोटी ७५ लाखांच्या बोलीवर दिल्ली संघात
  • रवि बिश्नोई २ कोटींच्या बोलीवर पंजाबच्या ताफ्यात
  • एम सिद्धार्थवर लागली २० लाखांची बोली, कोलकाताने घेतलं संघात
  • इशान पोरेल पंजाब संघात, २० लाख रुपयांची लागली बोली
  • कार्तिक त्यागी : १ कोटी ३० लाखांच्या बोलीवर राजस्थानच्या संघात
  • अनसोल्ड : पवन देशपांडे, शाहरूख खान, डॅनिअल सॅम्स, केदार देवधर, के एस भरत, प्रभसिमरन सिंग, अंकुश बेन्स, कुलवंत खेजरोलिया, तुषार देशपांडे, विष्णु विनोद
  • आकाश सिंग : २० लाखांच्या बोलीवर राजस्थान संघात
  • अनुज रावत : ८० लाखांच्या बोलीवर राजस्थान संघात
  • मुंबईकर यशस्वी जैस्वाल राजस्थान संघात, २ कोटी ४० लाखांच्या बोलीवर राजस्थानच्या ताफ्यात
  • दीपक हुडा : ५० लाखांच्या बोलीवर पंजाब संघात
  • विराट सिंग : १ कोटी ९० लाखांच्या बोलीसह हैदराबाद संघात
  • राहुल त्रिपाटी : ६० लाखांच्या बोलीसह केकेआर संघात
  • अनसोल्ड : मनजोत कालरा, रोहन कदम आणि हरप्रीत भाटीया
  • अनसोल्ड : अ‍ॅडम झॅम्पा, हेडन वॉल्श आणि अफगाणिस्तानचा जहीर खान
  • पियुष चावला : ६ कोटी ७५ लाखांच्या बोलीसह चेन्नईच्या संघात
  • शेल्डन कॉट्रेल : ८ कोटी ५० लाखांच्या बोलीवर पंजाबच्या संघात
  • अनसोल्ड : न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथी
  • नॅथन कुल्टर नाईल : ८ कोटींच्या बोलीसह मुंबईच्या संघात..
  • जयदेव उनाडकट : ३ कोटींच्या बोलीसह राजस्थानच्या संघात..
  • अनसोल्ड : डेल स्टेन, मोहित शर्मा..
  • अनसोल्ड ५ यष्टिरक्षक : एन्रीच क्लासें, मुश्फिकूर रहिम, नमन ओझा, कुशल परेरा, शाय होप
  • अ‌ॅलेक्स कॅरी दिल्लीच्या संघात, २ कोटी ४० लाखांच्या बोलीवर दिल्लीने घेतले आपल्या ताफ्यात
  • अनसोल्ड : स्टुअर्ट बिन्नीला कोणत्याही संघाने घेतले नाही.
  • ख्रिस मॉरिस : आरसीबी संघात, १० कोटींच्या बोलीसह बंगळुरूने घेतले संघात
  • सॅम करन : ५ कोटी ५० लाखांच्या बोलीवर चेन्नईच्या संघात
  • ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स आयपीएल इतिहासातील महागड्या खेळाडूंपैकी एक, १५ कोटी ५० लाखांना कोलकाताने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे.
  • अनसोल्ड : युसूफ पठाण आणि कॉलिन डी ग्रँडहोम
  • ख्रिस वोक्स : १ कोटी ५० लाखांच्या बोलीवर दिल्लीच्या संघात
  • ग्लेन मॅक्सवेल : पंजाबच्या १० कोटी ७५ लाखांच्या बोलीवर संघात
  • अ‌ॅरोन फिंच : आयसीबीमध्ये, कोलकाता नाईट रायडर्स आणि आरसीबी यांच्यात चुरस पाहायला मिळाली. मात्र, आयसीबीने मारली बाजी, ४ कोटी ४० लाख रुपये खर्चत घेतले संघात.
  • रॉबिन उथप्पा : ३ कोटी रुपयांच्या बोलीवर राजस्थानच्या ताफ्यात
  • जेसन रॉय : दिल्लीच्या संघात, १ कोटी ५० लाख रुपयांची लागली बोली
  • अनसोल्ड हनुमा विहारी : भारतीय हनुमा विहारीला कोणत्याही फ्रेंचायझीने घेतलं नाही.
  • इयान मॉर्गन : केकेआरच्या संघात, राजस्थान रॉयल्स आणि केकेआर यांच्यात लागलेल्या चढाओढीत केकेआरने मॉर्गनला ५ कोटी २५ लाखात घेतलं
  • पहिली बोली : ख्रिस लीन, मुंबईने लीनला २ कोटी रुपयात संघात घेतलं.
  • आयपीएल लिलावाला सुरूवात, चेअरमन बृजेश पटेल यांनी बीसीसीआय अधिकारी आणि सर्व फ्रेंचायझीचे केलं स्वागत
Last Updated : Dec 19, 2019, 10:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details