मुंबई- भारतीय क्रिकेट संघाने अनेक चढउतार पाहत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला. तसेच भारतीय खेळाडूंनी आपल्या शानदार खेळाने जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या मनात आदराचं स्थान काबीज केलं. भारतात पहिल्यांदा कसोटी क्रिकेटपासून सुरूवात झाली. त्यानंतर एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट खेळण्यात येऊ लागलं. क्रिकेटच्या या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय खेळाडूंनी आपली छाप सोडली. आता आम्ही तुम्हाला भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिला षटकार ठोकणारे खेळाडूंची माहिती देणार आहोत...
भारताने आपला पहिला कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध १९३२ मध्ये खेळला. या सामन्यात भारतीय संघाला पराभूत व्हावं लागलं. इंग्लंडने हा सामना १५८ धावांनी जिंकला. कसोटीत भारताकडून पहिला षटकार ठोकण्याचा मान अमरसिंग यांच्या नावे आहे. त्यांनी १९३२ मध्ये हा कारमाना केला होता.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून पहिला षटकार लिटल मास्टर सुनिल गावस्कर यांनी ठोकला होता. त्यांनी हा षटकार १९७४ मध्ये इंग्लंडविरुद्ध ठोकला.
टी-२० क्रिकेटमध्ये विरेंद्र सेहवागने भारताकडून पहिला षटकार खेचला होता. त्याने २००६ मध्ये हा कारनामा केला होता.