मुंबई -भारताविरूद्ध आपला पहिला डे-नाइट कसोटी सामना खेळणाऱ्या इंग्लंड संघाचा पहिला डाव अवघ्या ११२ धावांवर आटोपला. भारताच्या फिरकी माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्कारली. अक्षर पटेल आणि आर. अश्विन या जोडीने ९ गडी बाद केले. यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक जुना व्हिडिओ शेअर करत इंग्लंड फलंदाजीची खिल्ली उडवली.
विरेंद्र सेहवाग हा हटक्या ट्विटसाठी प्रसिद्ध आहे. त्याने भारताविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा डाव अवघ्या ११२ धावांत आटोपल्यानंतर एक ट्विट केलं आहे. यात त्याने, राहुल गांधी यांचा जुना व्हिडिओ शेअर करत इंग्लंड संघाची खिल्ली उडवली आहे.