नवी दिल्ली -भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने कोरोनाव्हायरसच्या या कठीण काळात प्रवासी मजुरांना घरगुती जेवण दिले आहे. त्याच्या या कृतीमुळे सेहवाग सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला. सेहवागने स्वत: चा आणि आपल्या कुटुंबाचा एक फोटो शेअर केला. यामध्ये तो लोकांसाठी अन्न पॅक करताना दिसत आहे. त्याने लोकांपर्यंत अन्न पोहोचवण्याचा फोटोही शेअर केला आहे.
या मदतीसोबत सेहवागने आपल्या चाहत्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. "अन्न बनवून घरी पॅक करुन आणि या कठीण काळात ते गरजू प्रवासी मजुरांपर्यंत पोहोचल्याने जे समाधान मिळाले आहे, त्याची तुलना फार थोड्या गोष्टींशी करता येईल", असे त्याने कॅप्शनमध्ये म्हटले.