लॉडरहित -टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज संघात आजपासून टी -२० मालिकेला प्रारंभ होत आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्वाची असणार आहे. आज होणाऱ्या पहिल्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची पत्रकार परिषद झाली.
या चर्चेत विराटने पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. तो म्हणाला, 'धोनी आणि पांड्या संघात नसणे ही संघात समाविष्ट केलेल्या खेळाडूंसाठी सुवर्णसंधी असणार आहे. आपल्याकडे पुढील टी -२० विश्वकरंडकापूर्वी २५-२६ सामने आहेत. त्यामुळे सर्व सामने महत्वाचे आहेत. संघाच्या दृष्टीने कोण कसे प्रदर्शन करत आहे ते कळेल. येणाऱ्या दिवसात अंतिम १५ आणि अंतिम ११ खेळाडू निवडता येतील.'