विशाखापट्टणम -टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध पहिल्या कसोटी मालिकेला आजपासून प्रारंभ झाला आहे. या मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला एक खास विक्रम करण्याची नामी संधी असणार आहे.
हेही वाचा -विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप : भारताच्या अविनाश साबळेचा राष्ट्रीय विक्रम
भारताचे दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांच्या पंक्तीत विराटला बसण्याची संधी असणार आहे. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत विराटने जर २४२ धावा केल्या तर, आफ्रिकेविरुद्ध १००० धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये त्याला स्थान मिळवता येईल.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध विराटने नऊ सामन्यात ७५८ धावा केल्या आहेत. तर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या नावावर २५ कसोटी सामन्यांत १७४१ धावा जमा आहेत. भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्या खात्यात १५ कसोटीत १३०६ आणि द्रविडच्या खात्यात २१ कसोटीत १२५२ धावा आहेत.