मुंबई -भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे आभार मानले आहेत. धोनीने स्वातंत्र्यदिनाच्या सायंकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याच्या निवृत्तीनंतर, अनेकांनी त्याला भावी जीवनप्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
बीसीसीआयने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये कोहली म्हणाला, "कधीकधी शब्द आयुष्यात कमी पडतात आणि मला वाटते की हा एक क्षण आहे. मी फक्त इतकेच म्हणू शकतो की तू नेहमीच असा व्यक्ती आहेस जो बसमध्ये शेवटच्या सीटवर बसतो. आमच्यात चांगली मैत्री आणि समंजसपणा आहे. कारण आम्ही नेहमीच तीच भूमिका बजावली, जी संघासाठी फायदेशीर ठरेल.''