नवी दिल्ली - पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने निवृत्ती घोषीत केली. मात्र, अद्याप त्याचे क्रिकेटप्रती असलेले प्रेम कमी झालेले नाही. आज घडीलाही ४४ वर्षीय शाहिद टी-२० सामने खेळताना दिसतो. क्रिकेट शिवाय शाहिद सोशल मीडियावर नेहमी 'अॅक्टिव' असतो. त्याने आपल्या जगभरातील चाहत्यांसाठी आपल्या घराचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, आफ्रिदीचे अलिशान घर दिसत आहे. हे घर समुद्राच्या किनाऱ्यावर बांधण्यात आलेले आहे. यात स्मूकरपासून टेबल टेनिस खेळांचे मैदाने आहेत. घरात आफ्रिदीने, आपल्या जीवनातील अविस्मरणीय क्षणांच्या आठवणी जतन करुन ठेवल्या आहेत.
हेही वाचा -पाकिस्तानचे भारताला 'अल्टिमेटम', जूनपर्यंत कळवा पाकमध्ये खेळणार की नाही
आफ्रिदीने आपल्या घरात श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू कुमार संगकारा, भारतीय कर्णधार विराट कोहली, फिरकीपटू शेर्न वॉर्न आणि एबी डिविलियर्स यांच्या सारख्या दिग्गज खेळाडूंची जर्सी आठवण म्हणून ठेवली आहे. तसेच त्याने विविध स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल मिळालेल्या ट्रॉफी जमा करुन ठेवल्या आहेत.
महत्वाचे म्हणजे, आफ्रिदीने भारताचा मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकरचीही आठवण जपून ठेवली आहे. ती आठवण म्हणजे, सचिनची बॅट. अवघ्या ३७ चेंडूत शतक झळकावत आफ्रिदीने जो विक्रम केला होता, त्यावेळी त्याने वापरलेली बॅट ही सचिन तेंडुलकरची होती. ती बॅट आफ्रिदीने आठवण म्हणून ठेवली आहे.
या 'बॅट' विषयी आफ्रिदीने आपल्या ऑटोबायोग्राफीत उल्लेख केला आहे. सचिनने त्याची आवडती बॅट सियालकोट येथे वकार युनुसला दिला होती. सियालकोट हे क्रीडा साहित्याच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. तेथे या बॅटची कस्टम मेड आवृत्ती बनवण्यासाठी सचिनने ती वकारला दिली होती. ती बॅट वकारने सियालकोटला नेण्यापूर्वी आफ्रिदीला फलंदाजीला जाताना दिली. तेव्हा आफ्रिदीने ऐतिहासिक शतके ठोकले. असे आफ्रिदीने त्याच्या आत्मचरित्रात लिहिले आहे.
हेही वाचा -VIDEO: नोव्हान जोकोव्हीच २५० किलो सुमो पैलवानशी पंगा घेतो, तेव्हा..