दुबई - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटूचा मान पटकावला. तर ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ दशकातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू ठरला.
मागील दहा वर्षामध्ये विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. यात ३९ शतके आणि ४८ अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने ११२ झेल देखील टिपले आहेत. दुसरीकडे स्टिव्ह स्मिथने दहा वर्षांत ७ हजार ४० धावा केल्या आहे. त्याची सरासरी ६५.७९ इतकी आहे. यात २६ शतके व २८ अर्धशतकांचा समावेश आहे.
काय म्हणाला विराट...
दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटूचा मान पटकावल्यानंतर विराटने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, 'संघाच्या विजयात हातभार लावणे, हेच माझे ध्येय आहे. प्रत्येक सामन्यात ते गाठण्याचा मी प्रयत्न करतो.
दरम्यान, भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची रविवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे दशकातील एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणून घोषणा करण्यात आली. तर विराट कोहलीला कसोटी संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे.