नवी दिल्ली -भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ट्विटरच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. विराट आपल्या एका ट्विटवरून २.५१ कोटी रुपये (सुमारे ३.५ लाख डॉलर्स) कमावतो, असे अमेरिकेची क्रीडा वेबसाईट असलेल्या ब्लेचरच्या विश्लेषणामध्ये उघड झाले आहे.
विराटची 'ट्विटर'वरची कमाई वाचाल, तर थक्क व्हाल! - विराट कोहली लेटेस्ट कमाई न्यूज
पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो ट्विटरवरील कमाईच्या बाबतीत जगात प्रथम स्थानावर आहे. रोनाल्डोला एका ट्विटमधून ६.२ कोटी रुपये (सुमारे ८६ लाख डॉलर्स) मिळतात. या अहवालात विराट कोहली पाचव्या क्रमांकावर आहे.

'विराट कोहली भारतीय क्रिकेट संघासाठी 'रन मशीन' म्हणून उदयास आला आहे. त्याने अनेक विक्रमही मोडले आहेत. यामुळे तो देशात आणि जगात खूप लोकप्रिय आहे. तो बर्याच नामांकित आणि मोठ्या ब्रॅण्डशी संबंधित आहे, ज्यामुळे त्याच्या कमाईत आणखी वाढ झाली आहे', असे ब्लेचरने म्हटले आहे.