हैदराबाद - ख्रिसमस सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या सणाला प्रत्येक लहान मुलाला सांताक्लॉजचे खूप आकर्षण असते. तेव्हा भारतीय संघाचा कर्णधार सांताक्लॉजच्या वेशात कोलकात्यातील अनाथआश्रमात पोहोचला आणि त्याने अनाथ मुलांना भेटवस्तू व खाऊ दिले. विराटला सांताक्लॉजच्या रुपात पाहून मुलांच्या चेहर्यावर हास्य दिसून आले.
ख्रिसमसच्या दिवशी लहान मुलं आपल्याला भेटवस्तू आणि आवडीचा खाऊ देणाऱ्या सांताक्लॉजची वाट पाहत असतात. अनाथ मुलांनाही हा आनंद अनुभवता यावा, यासाठी विराटने सांताक्लॉजच्या रुपात अनाथ आश्रमात पोहोचला. स्टार स्पोर्ट्स या वाहिनीने विराट कोहलीचा व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडिओत विराट सांताक्लॉजच्या वेशात लहान मुलांसोबत मस्ती करताना दिसून येत आहे. एका मुलाने तुझी दाढी मला खूप आवडते असं विराटला सांगितलं. हे ऐकून विराटलाही हसू आवरलं नाही.