मुंबई- जगभरात कोरोना विषाणूने उच्छाद मांडला आहे. भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या २७१ वर पोहोचली आहे. तर देशात पाच जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता राखणे, प्रवास टाळणे, हात धुणे, एकमेकांपासून कमीतकमी २ हात दूर राहून बोलणे, मास्क घालणे यासारखे आवाहन करण्यात येत आहे. अशात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
कोरोनामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका रद्द करावी लागली. धर्मशाला येथील पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द करावा लागला. त्यानंतर देशातील कोरोना संक्रमित लोकांची संख्या वाढल्याने, बीसीसीआयने ही मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. मालिका रद्द झाल्यानंतर विराट विमानतळावरून परतत होता. त्यावेळी एक तरुणी विराटसोबत सेल्फी घेण्यासाठी धावत आली, परंतु विराटने तिच्याकडे न पाहिल्यासारखे केले आणि पुढे निघून गेला.