बंगळुरू- ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर टी-टवेन्टी मालिकेत पराभव झाल्यानतंर भारतीय कर्णधार विराट कोहलीने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, की ऑस्ट्रेलियाच्या संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात आमच्यापेक्षा चांगले प्रदर्शन केले. मॅक्सवेलच्या शतकाने सामना पूर्णत: ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकला.
विराट म्हणाला, की ही मालिका खूप छोटी होती. त्यामुळे आपण कामगिरीचे आकलन करू शकत नाही. ऑस्ट्रेलियाच्या संघाने तीनही आघाडीवर आमच्यापेक्षा चांगला खेळ केला. १९० धावांचे आव्हान कोणत्याही खेळपट्टीवर आव्हानात्मक आहे. परंतु, खेळपट्टीवर दव पडल्याने गोलंदाजांना प्रयोग करणे अवघड होत होते. ग्लेन मॅक्सवेलने ज्याप्रकारे फलंदाजी केली, त्यानंतर, तुम्ही काही करू शकत नाही.
संघनिवडीबाबत बोलताना विराट म्हणाला, आम्हाला सर्व खेळाडूंना संधी द्यायची आहे. खेळाडू दबावात कसे प्रदर्शन करतात हे आम्हाला पाहायचे आहे. आगामी मालिकेतही आम्ही नवनवे प्रयोग करणार आहोत. त्यामुळे खेळाडूंना संघात जागा मिळवण्यासाठी चांगले प्रदर्शन करण्याची संधी असणार आहे.
ऑस्ट्रेलिया तीनही क्षेत्रात आमच्यापेक्षा सरस ठरली - विराट कोहली - ग्लेन मॅक्सवेल
ऑस्ट्रेलियाच्या संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात आमच्यापेक्षा चांगले प्रदर्शन केले. मॅक्सवेलच्या शतकाने सामना पूर्णत: ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकला.
विराट ११
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच म्हणाला, भारताविरुद्ध भारतातच मालिका जिंकणे कधीही विशेष ठरते. मॅक्सवेलने चांगली फलंदाजी करताना सामना आमच्या बाजूने झुकवला. विशेष म्हणजे अॅडम झॅम्पाने केलेली चांगली गोलंदाजी ऑस्ट्रेलियाच्या विजयातील महत्वपूर्ण कारण ठरले.