नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीचा आज ३१ वा वाढदिवस आहे. विराट कोहलीने आत्तापर्यंत यशाची अनेक शिखरे पार केली आहेत. त्यांच्या अफलातून खेळीमुळे भारतीयांच्या मनामनात त्याने स्थान मिळवले आहे. भारतातूनच नाही तर जगभरातून विराटवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वाढदिवशी विराटने स्वतःलाच म्हणजे कुमार वयातील चीकूला एक प्रेरणादायी पत्र लिहिले आहे.
३१ व्या वाढदिवशी विराटने एक खास पत्र स्वत:लाच लिहिले आहे. १५ वर्षांच्या विराटलीला मी माझ्या जीवनाचा प्रवास सांगत आहे, असे कॅप्शन त्याने ट्विटला दिले आहे. त्याबरोबरच हाताने लिहिलेले एक पत्रही पोस्ट केले आहे. तु स्वप्नांचा पठलाग कर, चांगल्या संधी तुझ्या जीवनात येतील, त्यांच्यासाठी कायम तयार रहा, जीवनाचा प्रवास रोमांचकारी असून प्रत्येक अपयश आणि संधीमधून तुला शिकायला मिळेल. कुटुंबावर प्रेम करत रहा. उंच झेप घेण्याचं स्वतःला आश्वासन दे, त्यासाठी कायम प्रयत्न करत रहा, असे पत्रात लिहिले आहे.