लीड्स- मी ज्यावेळी भारतीय संघाच्या प्रथम ड्रेसिंग रुममध्ये गेलो होते. त्यावेळी माझा कर्णधार महेंद्रसिंह धोनी होता. तेव्हापासून माझ्या मनात धोनीच माझा कर्णधार होता आणि तोच कायम राहणार, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिली आहे. आयसीसीने धोनीच्या जन्मदिवसाच्या एकदिवस आधी त्यांच्या कार्यकिर्दीवर एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यामध्ये विराटने आपले मत व्यक्त केले आहे. कोहलीने या व्हिडिओच्या माध्यमातून धोनीवर स्तुतीसमने उधळली.
कोहली म्हणाला की, मी पहिल्यांदा ज्यावेळी भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये गेले होतो. त्यावेळी माझा कर्णधार महेंद्रसिंह धोनी होता. आज भलेही भारतीय संघाचा कर्णधार असेन मात्र, माझ्यासाठी धोनीच माझा कर्णधार आहे आणि तो कायम राहणार आहे, असे त्याने सांगितलं.
महेंद्रसिंह धोनी हा महान खेळाडू आहे. त्याच्याकडे संघ दबावात असताना योग्य निर्णय घेण्याची क्षमता आहे. तसेच प्रतिकूल परिस्थितीतही स्वतःला शांत ठेवण्याची विलक्षण कसब धोनीकडे आहे. धोनीकडून खूप काही शिकण्यासारखे असल्याचे कोहली म्हणाला.