नवी दिल्ली - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या वेस्ट इंडीज विरुध्दच्या टी-२० मालिकेत व्यस्त आहे. विंडीज विरुद्धच्या ३ सामन्याच्या मालिकेत दोन सामने झाले असून पहिला सामना भारताने तर दुसरा वेस्ट इंडीजने जिंकला आहे. अखेरचा तिसरा निर्णायक सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर उद्या (बुधवारी) रंगणार आहे. दरम्यान, या सामन्याआधी एका मुलाखतीत विराटने आपली आवडती अभिनेत्रीविषयी सांगितलं.
तिरुअनंतपुरमच्या सामन्यानंतर विराटने एका क्रीडावाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत विराटला तुझी आवडती अभिनेत्री कोण असा प्रश्न विचारण्यात आला. महत्वाचे म्हणजे, यात अनुष्का शर्माला सोडून दुसरी अभिनेत्रीविषयी हा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा विराट समोर श्रध्दा कपूर, दीपिका पादुकोन, कॅटरिना कैफ आणि आलिया भट्ट हे चार पर्याय ठेवण्यात आले.