महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

हे काय म्हणाला विराट.. विश्वचषकासाठी भारत प्रबळ दावेदार नाही - virat kohli

विराट म्हणाला की, विश्वचषक जिंकण्यासाठी कोणताच संघ प्रबळ दावेदार नाही. प्रत्येक संघ बलवान आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या संघात समतोल आहे. पाकिस्तानचा संघ कुणालाही हरवू शकतो. विंडीजचा संघ चांगला खेळतोय. न्यूझीलंडमध्ये स्फोटक फलंदाज असल्याचे कोहलीने सांगितले.

विराट कोहली

By

Published : Mar 14, 2019, 10:55 PM IST

दिल्ली - गेल्या वर्षी देश विदेश बहारदार कामगिरी करणारा भारतीय संघ इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी प्रबळ दावेदार मानला जातोय. मात्र, कर्णधार विराट कोहली भारतीय संघ विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानत नाही. असे वक्तव्य त्याने पाचवा एकदिवसीय सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत केले.

विराट म्हणाला की, विश्वचषक जिंकण्यासाठी कोणताच संघ प्रबळ दावेदार नाही. प्रत्येक संघ बलवान आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या संघात समतोल आहे. पाकिस्तानचा संघ कुणालाही हरवू शकतो. विंडीजचा संघ चांगला खेळतोय. न्यूझीलंडमध्ये स्फोटक फलंदाज असल्याचे कोहलीने सांगितले.

विराट बोलताना पुढे म्हणाला की, विश्वचषकासाठी भारतीय संघ हा जवळपास निश्चीत झालेला असून, एका जागेसाठी विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे विश्वचषकासाठीच्या संघात कोणता खेळाडू आपले स्थान पक्क करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details