नवी दिल्ली -बास्केटबॉल स्टार कोबी ब्रायंट आणि त्याची १३ वर्षीय मुलगी गियाना यांचा रविवारी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. या बातमीने संपूर्ण जग हादरले. अनेकांनी कोबीबद्दल आपल्या भावनाही व्यक्त केल्या. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीलासुद्धा आपले दु:ख लपवता आले नाही. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून कोबीबद्दल एक भावनिक पोस्ट केली आहे.
'तुझ्यासाठी मी पहाटे उठायचो', कोबीच्या जाण्याने विराट भावूक - विराट कोहलीला कोबीच्या निधनाचे दु:ख न्यूज
कोबीच्या निधनानंतर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीलासुद्धा आपले दु:ख लपवता आले नाही. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून कोबीबद्दल एक भावनिक पोस्ट केली आहे.
'आज ही बातमी ऐकून मी पूर्णपणे उद्ध्वस्त झालो. लहानपणी मी या 'जादूगाराला' कोर्टमध्ये खेळताना बघायचो. देव त्याच्या आत्म्याला शांती देवो. त्याच्या कुटुंबास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो', असे विराटने आपल्या पोस्टच्या कॅप्शमध्ये म्हटले आहे.
कोबीच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. लॉस एंजेलिसपासून ६५ किमी अंतरावर ही दुर्घटना घडली. कोबीच्या मालकीच्या हेलिकॉप्टरला हवेतच अचानक आग लागली. त्यानंतर हे हेलिकॉप्टर झाडांमध्ये कोसळले. भयंकर लागलेल्या आगीमुळे बचाव पथकाला मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागला. हा अपघात इतका भीषण होता की हेलिकॉप्टरमधले कुणीही वाचू शकले नाही. या अपघातात कोबीसह त्याची मुलगी आणि ९ जण असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, हेलिकॉप्टरमध्ये आग नेमकी कशी लागली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. कोबीच्या मृत्यूनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, बराक ओबामा यांच्यासह अनेक क्रीडा विश्वातील दिग्गजांनी ट्विटरवर हळहळ व्यक्त केली आहे.