महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कोहलीचा धोनीला दणका, कर्णधार म्हणून 'या' विक्रमात टाकलं मागे

कर्णधार म्हणून  विराटने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला पछाडले आहे. धोनीला हा टप्पा ओलांडण्यासाठी १२७ डाव खेळावे लागले होते. तर, विराटने ८२ डावांतच ५००० धावा पूर्ण केल्या आहेत.

Virat Kohli passes dhoni in fastest 5,000 ODI runs as captain
कोहलीचा धोनीला दणका, कर्णधार म्हणून 'या' विक्रमात टाकलं मागे

By

Published : Jan 19, 2020, 8:37 PM IST

बंगळुरू -भारतीय कर्णधार विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५००० धावांचा टप्पा ओलांडणार सर्वात वेगवान कर्णधार ठरला आहे. रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात त्याने हा पराक्रम केला.

हेही वाचा -रोहित शर्माच्या वनडेतील ९००० धावा पूर्ण

कर्णधार म्हणून विराटने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला पछाडले आहे. धोनीला हा टप्पा ओलांडण्यासाठी १२७ डाव खेळावे लागले होते. तर, विराटने ८२ डावांतच ५००० धावा पूर्ण केल्या आहेत. या विक्रमात ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी कर्णधार रिकी पाँटिंग तिसऱ्या स्थानावर आहे. कर्णधार म्हणून १३१ डावात पाँटिंगने ५००० धावा पूर्ण केल्या होत्या.

भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने १३६ डावात ५००० धावा पूर्ण केल्या होत्या. तर, दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने १३५ डावात हा पराक्रम केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details