दुबई -आयसीसीने रविवारी जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ पहिल्या तर, विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा केन विल्यमसन तिसर्या क्रमांकावर आहे. पहिल्या दहा फलंदाजांमध्ये चेतेश्वर पुजारा (आठव्या) आणि अजिंक्य रहाणे (दहाव्या) क्रमवारीत कायम आहेत.
या यादीत पाकिस्तानचा बाबर आझम सहाव्या स्थानावर आहे, तर इंग्लंडचा कर्णधार जो रूट नवव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शून्य आणि नऊ धावा करणारा बेन स्टोक्स चौथ्या स्थानावरून सातव्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडविरूद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात १५६ धावा करणारा डावखुरा फलंदाज मसूद कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट १९व्या क्रमांकावर पोहोचला आहे.