महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विराटने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी बदलला लुक, पाहा फोटो - विराटने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी बदलला लुक

स्वित्झरलँडहून परतल्यानंतर विराटने नामवंत हेयर स्टायलिस्ट आलिम हाकिम यांच्याकडे हेअरकट केला आहे.

virat kohli latest hair cut ahead of t20 series against sri lanka
विराटने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी बदलला लुक, पाहा फोटो

By

Published : Jan 2, 2020, 6:15 PM IST

नवी दिल्ली - भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेला ५ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली या मालिकेत नव्या लुकमध्ये पाहायला मिळेल. स्वित्झरलँडहून परतल्यानंतर विराटने नामवंत हेयर स्टायलिस्ट आलिम हाकिम यांच्याकडे हेअरकट केला आहे.

विराटने नव्या लुकचे फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत. या फोटोत विराटसह आलिम हाकिमही दिसून येत आहेत. दरम्यान, हाकिम हे नामवंत हेअर स्टायलिस्ट असून हार्दिक पांड्या, युवराज सिंग, युझवेंद्र चहल यांच्यासह अनेक नामवंत खेळाडूचे हेअरकट ते करतात.

हाकिम यांनी केलेला हेअरकट विराट कोहलीला शोभून दिसत आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ५ जानेवारीला गुवाहाटीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

भारत श्रीलंका संघातील टी-२० मालिकेचे वेळापत्रक -

  • पहिला टी-२० सामना, ५ जानेवारी, गुवाहाटी, सायंकाळी ७ वाजता
  • दुसरा टी-२० सामना, ७ जानेवारी, इंदूर, सायंकाळी ७ वाजता
  • तिसरा टी-२० सामना, १० जानेवारी, पुणे, सायंकाळी ७ वाजता
  • टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ -
    विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सॅमसन, ऋषभ पंत, शिवम दुबे, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदर.
  • टी-२० मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ -
    लसिथ मलिंगा (कर्णधार), दनुष्का गुणातिलाका, अविष्का फर्नांडो, अँजलो मँथ्यूज, दसुन शनाका, कुसल परेरा, निरोशन डिकवेला, धनंजय डि सिल्वा, इसुरु उडाना, भनुका राजपक्षे, ओशाडा फर्नांडो, वनिंदु हसरंगा, लहिरु कुमारा, कुसल मेंडिस, लक्षन संदाकन आणि कसुन रजीता.

ABOUT THE AUTHOR

...view details