नवी दिल्ली -आयसीसीने मंगळवारी आज कसोटीमधील फलंदाजांची क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. तर यंदाचा विश्वकरंडक हुकलेल्या न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसन दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.
ICC कसोटी क्रमवारी : विराट पहिला तर, विश्वकरंडक न खेळलेला 'हा' खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर - icc ranking
भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारा या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.
![ICC कसोटी क्रमवारी : विराट पहिला तर, विश्वकरंडक न खेळलेला 'हा' खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3925780-80-3925780-1563891883053.jpg)
या क्रमवारीमध्ये भारताच्याच फलंदाजाने तिसरे स्थान राखले आहे. भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारा या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. या क्रमवारीनुसार विराटचे 922, केन विल्यमसनचे 913 तर चेतेश्वर पुजाराचे 881 गुण आहेत. पहिल्या सर्वोत्तम दहा फलंदाजांमध्ये विराट आणि पुजारा या दोन भारतीयांनाच आपले स्थान कायम राखता आले आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या एकदिवसीय संघाच्या क्रमवारीत इंग्लंडने भारताला पछाडत पहिल्या स्थानावर झेप घेतली होती. आयसीसीने जाहीर केलेल्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत कोहलीने अव्वल स्थान पटकावले आहे. फलंदाजांच्या या यादीमध्ये कोहलीने 886 गुणांसह पहिले स्थान कायम राखले आहे. तर, याच यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारताचा हिटमॅन रोहित शर्मा आहे. रोहितच्या खात्यात 881 गुण जमा आहेत.