दुबई -आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून झालेल्या पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीवर जोरदार टीका झाली. विराटने या सामन्यात क्षेत्ररक्षणात आणि फलंदाजीत सुमार कामगिरी केली. चाहत्यांनीही विराटच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या सामन्यानंतर विराटचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राजकुमार शर्मा म्हणाले, ''प्रत्येक खेळाडूचा मैदानावर चांगला आणि वाईट दिवस असतो आणि त्यावर कोणीही नियंत्रण ठेवू शकत नाही. विराटने स्वत: साठी असे उच्च मापदंड ठेवले आहेत, की प्रत्येक वेळी मैदानावर त्याने चांगली कामगिरी करावी अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. हा खेळाडूंच्या जीवनाचा एक भाग आहे. खेळपट्टीवर तुमच्यासाठी चांगले आणि वाईट दिवस आहेत. विराट हा मशीन नव्हे तर एक माणूस आहे हे लोक विसरले आहेत.''