पोर्ट ऑफ स्पेन -टीम इंडिया विरुध्द वेस्ट इंडिज संघातील दुसरा एकदिवसीय सामना आज ( रविवारी ) पोर्ट ऑफ स्पेन मध्ये रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. टीम इंडियाचा कर्णधार विराटही एका मोठ्या विक्रमासाठी सज्ज झाला आहे.
विराटला पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियांदादचा विक्रम मोडण्याची संधी असणार आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये विंडिजविरुद्ध सर्वाधिक धावा जावेद मियांदादने केल्या आहेत. मियांदादने विडिंजविरुद्ध ६४ डावांत एकूण १९३० धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याच्या एक शतकाचा आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे.