मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७०वा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. क्रीडा क्षेत्रातील अनेक खेळाडूंनीही मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात सचिन तेंडुलकर, विराट कोहली, युवराज सिंह, शिखर धवन, प्रशिक्षक रवी शास्त्री, गौतम गंभीर, सुरेश रैना, चेतेश्वर पुजारा, व्हीव्हीएस लक्ष्मण, हरभजन सिंग, कृणाल पांड्या, केदार जाधव आदीचा समावेश आहे.
सचिनने आपल्या ट्विटमध्ये शुभेच्छा देताना, दिर्घायुष्य लाभो, अशी देवा चरणी प्रार्थना केली आहे.
विराट कोहलीने यूएईमधून ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत.