शारजाह - आयपीएलच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने विजयावर शिक्कामोर्तब करण्यात यश मिळवले. सलामीवीर मयांक अग्रवाल, कर्णधार लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांच्या फटकेबाजीमुळे पंजाबने बंगळुरूला ८ गडी राखून पराभूत केले. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी एक धाव हवी असताना निकोलस पूरनने षटकार मारत विजयश्री खेचून आली. या सामन्यात एबी डिव्हिलियर्सला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. या निर्णयावर विराटने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
...म्हणून डिव्हिलियर्स उशीरा फलंदाजीला आला - विराट कोहली
पंजाबविरुद्धच्या सामन्यात बंगळुरूने १७१ धावांपर्यंत मजल मारली. संघाने वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे यांना आधी पाठवत डिव्हिलियर्सला मागे ठेवले. बंगळुरूच्या डावाच्या १८व्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात डिव्हिलियर्स दोन धावा काढून माघारी परतला.
विराट म्हणाला, ''डिव्हिलियर्स कोणत्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येईल याबद्दल आमची चर्चा झाली. ड्रेसिंग रुममधून मला असा संदेश मिळाला, की डावा-उजवा फलंदाज यांचे कॉम्बिनेशन सुरू ठेवायचे आहे. कधीकधी तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरत नाही, पण तरीही आम्ही हा प्रयोग केला. या निर्णयाबद्दल मी खुश आहे. कधीकधी तुमच्या मनासारखे होत नाही.''