मुंबई- केरळमध्ये काही लोकांनी एका गर्भवती हत्तीणीची क्रूरपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली. यानंतर सोशल मीडियावर प्राणीप्रेमींसह नेटीझन्समधून संताप व्यक्त होत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीदेखील या घटनेने दु:खी झाला आहे. त्याने ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या.
भूकेल्या गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूनंतर विराट म्हणाला की, 'केरळमध्ये हत्तीणीबाबत जे काही घडले त्याबद्दल मला दु:ख झाले आहे. प्राण्यांबद्दल लोकांमध्ये ममत्व, प्रेम असायला हवे, असे धक्कादायक प्रकार थांबायला हवेत.'
दरम्यान, विराटसोबत यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याने देखील या घटनेचा निषेध केला आहे. त्याने केरळमध्ये गर्भवती हत्तीणीची जी क्रूरपणे हत्या केली आहे, ती धक्कादायक आहे. एवढे निर्दयी कोण कसे असू शकतं. या प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा द्यायला हवी, असे म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण -