दुबई -आयपीएलच्या तेराव्या हंगामातील ४४वा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर ऐतिहासिक विक्रमाची नोंद झाली आहे.
धोनीसेनेविरुद्धच्या सामन्यात कोहलीची 'विराट' कामगिरी - virat kohli latest ipl record
विराटने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) २०० षटकार पूर्ण केले आहेत. अशी कामगिरी करणारा विराट हा एकूण पाचवा आणि भारताचा तिसरा खेळाडू ठरला आहे. विराटने रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर शानदार षटकार लगावत ही कामगिरी केली. विराटपुढे ख्रिस गेल (३३६), एबी डिव्हिलियर्स (२३१), महेंद्रसिंह धोनी (२१६) आणि रोहित शर्मा (२०९) यांनी षटकार ठोकले आहेत.

आयपीएलमध्ये २०० षटकार मारण्याबरोबरच विराटने आरसीबीसाठी २०० षटकार ठोकले आहेत. आरसीबीसाठी अशी कामगिरी करणारा विराट हा तिसरा खेळाडू ठरला. यापूर्वी गेल (२३९) आणि डिव्हिलियर्स (२१८) यांनी आरसीबीकडून षटकार ठोकले आहेत. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात विराटने ४३ चेंडूंचा सामना करत ५० धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने एक षटकार आणि एक चौकारही लगावला.