गुवाहाटी -भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेला ५ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना रविवारी गुवाहाटी येथे रंगणार असून पहिल्या सामन्यात कोण बाजी मारतं याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
हेही वाचा -टेटे : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान गाठणारा मानव ठरला पहिला भारतीय खेळाडू
या सामन्यात हिटमॅन रोहित शर्माच्या गैरहजेरीचा विराटला फायदा होणार आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सध्या विराट आणि रोहित सर्वाधिक धावा करणारे फलंदाज आहेत. विराटने ७५ सामन्यांत २६३३ धावा केल्या आहेत तर रोहितने १०४ सामन्यात २६३३ धावा केल्या आहेत. त्यामुळे या मालिकेत विराट एक धाव काढताच रोहितला मागे टाकणार आहे.
गुवाहाटी येथे होणाऱ्या लंकेविरूद्धच्या पहिल्या सामन्यासाठी २७,००० तिकिटे आधीच विकली गेली आहेत.