कोलकाता -आपल्या नेतृत्वाखाली लागोपाठ चार वेळा डावाने विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने धोनीच्या मोठ्या विक्रमाला मागे टाकले. कर्णधार म्हणून कोहलीचा हा ३३ वा आणि लागोपाठ ७ वा विजय आहे. धोनीच्या लागोपाठ सहा कसोटी विजयाचा विक्रम किंग कोहलीने मोडित काढला आहे.
हेही वाचा -क्रिकेटपटू जयंत यादवचा झाला साखरपुडा...मुंबई इंडियन्सनं केलं खास ट्विट
कर्णधार म्हणून सलग ७ कसोटी विजय मिळवणारा विराट पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी कोणत्याही भारतीय कर्णधाराला सलग ७ कसोटी विजय मिळवता आले नव्हते. यासह भारताने दोन सामन्यांची मालिका २-० ने जिंकली. इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशचा एक डाव आणि १३० धावांनी पराभव केला. घरच्या मैदानावरील भारताचा हा सलग १२ वा मालिका विजय आहे.
२०१३ मध्ये भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार आणि वेस्ट इंडिजविरूद्ध दोन कसोटी सामने जिंकले होते. ईडन गार्डन्स मैदानावर खेळवल्या गेलेल्या ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशी वाघांची शिकार करत एक डाव आणि ४६ धावांनी विजय मिळवला. या विजयासोबत कसोटी मालिकाही भारताने खिशात घातली. याअगोदर झालेली टी-२० मालिकाही भारताने जिंकली होती