हैदराबाद- कोणत्याही संघाचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर कर्णधाराला आणि प्रशिक्षकांना काळजी वाटते. परंतु, हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचे फलंदाज बाद होत असताना कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री खूश होत होते, असे खुद्द विराटने पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर २३७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची ४ बाद ९९ अशी स्थिती झाली होती. ऑस्ट्रेलिया सामन्यात पुनरागमन करण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु, भारताच्या अशा कठीण परिस्थितीत विराट आणि शास्त्री खूश होते. कोहलीने याचे कारण देताना सांगितले की, भारताचे ९९ धावांवर ३ फलंदाज बाद झाल्यानंतर शास्त्रींबरोबर चर्चा करताना संघासाठी ही परिस्थिती चांगली असल्याचे आम्ही एकमेकांशी बोलत होतो.