दुबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत पहिले स्थान कायम राखले आहे. ८९५ गुणांसह विराट कोहली प्रथम क्रमांकावर तर हिटमॅन रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा -धडाकेबाज फलंदाज शेन वॉटसनची 'नवी खेळी' सुरू
गोलंदाजांमध्ये भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह ७९७ गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे. तर या यादीत दुसरे स्थान न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने राखले आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये फक्त हार्दिक पांड्या हा एकमेव भारतीय खेळाडू आहे ज्याने पहिल्या दहामध्ये आपले नाव कोरले आहे. पांड्याकडे २४६ गुण आहेत. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स प्रथम क्रमांकावर आहे. त्याच्या खात्यात ३१९ गुण आहेत.
अष्टपैलू खेळाडूंच्या या यादीत अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी दुसर्या क्रमांकावर आहे. आयसीसीने शाकिब अल हसनवर क्रिकेट बंदी घातल्यामुळे तो या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीच्या यादीतून बाहेर पडला आहे.