महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विराट कोहली व अनुष्का शर्माचा कोरोना अहवाल निगेटिव्ह - अनुष्का शर्मा

ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडिलेड मैदानावर झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली पैटर्नल लीव वर भारतात परत आला आहे. त्यानंतर करण्यात आलेली कोहली व त्याची पत्नी अनुष्का शर्माची कोविड टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

virat-kohli-and-anushka-sharma-test-negative
विराट कोहली व अनुष्का शर्मा

By

Published : Jan 1, 2021, 5:12 PM IST

मुंबई - ऑस्ट्रलियाचा दौरा अर्धवट सोडून पैटर्नल लीववर भारतात आलेला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या चाहत्यासाठी सोशल मीडियावर पत्नी अनुष्कासोबत एक फोटो पोस्ट केला आहे. सोबत डीनर घेतानाचा फोटो शेअर करत कोहलीने सांगितले आहे, की आमच्या दोघांची कोविड-१९ चाचणी निगेटिव्ह आली आहे.

मित्रांनो ज्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे, ते आपला पॉझिटिव्ह वेळ एकत्र घालवताना असे कॅप्शन देऊन त्याने स्माईली इमोजी दिला आहे.

कोहलीने ट्विट केले आहे, की सुरक्षित वातावरणात मित्रांनी एकत्र येण्यासारखे दुसरे काहीही नाही. हे नवीन वर्ष आपणाला सुखाचे व आरोग्यदायी जावो. सुरक्षित राहा.

भारतीय क्रिकेट टीम आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. त्यामध्ये पहिल्या कसोटीत पराभव झाल्यानंतर कोहली मायदेशी परत आला असून दुसरी कसोटी जिंकणाऱ्या भारतीय संघाचे जगातील या दोन नंबरच्या नांमाकित फलंदाजाने ट्विट करून कौतुक केले आहे.

बॉक्सिंग डे कसोटीत पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर कोहलीने भारतीय गोलंदाजांचे कौतुक केले. त्यानंतर २७ डिसेंबरला ट्विट करत कोहलीने अजिंक्य रहाणेच्या शतकी खेळीची प्रशंसा केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details