मुंबई -भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी पोलीस कल्याण निधीमध्ये प्रत्येकी 5-5 लाख रुपयांच्या मदतीचा निर्णय घेतला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांनी शनिवारी ही माहिती दिली.
विराट आणि अनुष्काकडून मुंबई पोलिसांना 10 लाखाची मदत - virushka donate 5 lakh news
विराट आणि अनुष्काने केलेल्या या मदतीची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांनी शनिवारी दिली. यापूर्वी विराट आणि अनुष्कानेही पंतप्रधान सहायता निधीमध्ये देणगी दिली होती.
परमवीरसिंग ट्विटरवर म्हणले, "मुंबई पोलिस कल्याण निधीमध्ये प्रत्येकी 5-5 लाख रुपयांची मदत केल्याबद्दल विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे आभार. तुमचे योगदान तुमचे योगदान कोरोना लढ्यात कार्यरत मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी उपयुक्त ठरेल."
यापूर्वी विराट आणि अनुष्कानेही पंतप्रधान सहायता निधीमध्ये देणगी दिली होती. या व्यतिरिक्त कोहलीने आपला आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा साथीदार अब्राहम डिव्हिलियर्स याच्यासोबतही सामन्यातील वस्तूंचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता.