मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाला आज तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास प्रसंगी विराटने आपल्या पत्नीसाठी खास इंस्टाग्राम पोस्ट केली. त्याने आपल्या लग्नाचा एक फोटो शेअर करत या फोटोला सुंदर कॅप्शन लिहिले आहे.
हेही वाचा -निवृत्तीनंतर पार्थिव पटेल करणार 'हे' काम
कला आणि क्रीडा विश्वातील पॉवर कपल म्हणून विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची जोडी ओळखली जाते. २०१७मध्ये विराट आणि अनुष्काने इटलीमध्ये लग्न केले. या लग्नात केवळ ४२ लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. शिवाय, लग्नात कोणालाही मोबाइल फोन वापरण्यास परवानगी नव्हती.