मुंबई -भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी आसाम आणि बिहारमधील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, 21 जिल्ह्यांतील 1,536 खेड्यांतील 16 लाख लोकांना या पूराचा फटका बसला आहे. तर राज्यात पुरामुळे 100 हून अधिकजण मरण पावले आहेत. त्याचवेळी या पूराचा फटका बिहारमधील 20 लाख लोकांना बसला असून अनेकांनी आपले जीव गमावले आहेत.
विराटने गुरुवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून या लोकांना मदत करण्याविषयी माहिती दिली. त्याने ट्वीट केले की, ''एकीकडे आपला देश कोरोनाव्हायरसमुळे त्रस्त आहे. तर आसाम आणि बिहारमधील लोकही पूरामुळे त्रस्त आहेत, ज्यामुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे."