चेन्नई - आयपीएलमध्ये रॉयल चॅलेजर्स बंगळुरू संघाची सुरुवात फारच निराशाजनक झाली. पहिल्याच सामन्यात त्यांना चेन्नईच्या संघाकडून पराभव झाला. चेन्नईच्या भेदक गोलंदाजीपुढे त्यांचा संपूर्ण संघ अवघ्या ७० धावांत गुंडाळला गेला. याच सामन्यात विराट कोहली आणि एबी डिविलियर्स यांच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.
विराट अन् एबीच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद - rcb vs csk ipl 2019
आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा असे घडले की या दोन्ही फलंदाज एकही चौकार न मारता माघारी परतले.
![विराट अन् एबीच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2787478-139-e8213890-1fbf-495d-97e6-ab67fe093167.jpg)
विराट कोहली
विराट कोहील काल ६ तर एबी डिविलियर्स ९ धावांवर स्वस्तात बाद झाले. आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा असे घडले की या दोन्ही फलंदाज एकही चौकार न मारता माघारी परतले. ते दोघेही हरभजन सिंगच्या गोलंदाजीवर बाद झाले. तसेच विराट आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर बाद झाला आहे.