महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ICC T२० Rankings : कोहलीला 'विराट' कामगिरीचे बक्षिस, राहुलला फटका - विराट कोहली टी-२० क्रमवारी न्यूज

आयसीसीने ताजी टी-२० क्रमवारी झाली केली आहे. यात विराट कोहलीला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानी पोहोचला आहे.

virat kohli advances to top five in icc mens t20i player rankings
ICC T२० Rankings : कोहलीला 'विराट' कामगिरीचे बक्षिस, राहुलला फटका

By

Published : Mar 17, 2021, 4:47 PM IST

Updated : Mar 17, 2021, 5:04 PM IST

दुबई - इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत कर्णधार विराट कोहलीने सलग दोन अर्धशतक झळकावली. या कामगिरीचे विराटला बक्षिस मिळाले आहे. आयसीसी टी-२० फलंदाजांच्या यादीत विराटच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे.

आयसीसीने ताजी टी-२० क्रमवारी झाली केली आहे. यात विराट कोहलीला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानी पोहोचला आहे.

इंग्लंडविरुद्ध विराटचे दोन अर्धशतक -

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत-इंग्लंड यांच्यात ५ सामन्याची टी-२० मालिका खेळवण्यात येत आहे. यातील दुसऱ्या सामन्यात विराटने नाबाद ७३ धावांची खेळी साकारली होती. त्याच्या या खेळीमुळे भारताने हा सामना ७ गडी राखून जिंकला. यानंतर त्याने तिसऱ्या टी-२० सामन्यात नाबाद ७७ धावा केल्या. पण या सामन्यात भारताचा पराभव झाला.

राहुलला गचाळ कामगिरीचा फटका -

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत के एल राहुल फलंदाजीत अपयशी ठरला. त्याला तीन सामन्यात अनुक्रमे १, ०, ० धावा करता आल्या. या गचाळ कामगिरीचा फटका राहुलला क्रमवारीत बसला आहे. त्याची एका क्रमाने घसरण झाली असून तो चौथ्या स्थानी घसरला आहे. पाकिस्तानच्या बाबर आझमने त्याला मागे टाकले.

बटलर-बेअरस्टोची भरारी -

जोस बटलरने तिसऱ्या टी-२० सामन्यात नाबाद ८३ धावांची खेळी साकारली. या कामगिरीमुळे त्याची क्रमवारीत सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत आहे. बटलर ५ स्थानाच्या फायद्यासह १९व्या स्थानी पोहोचला आहे. दुसरीकडे याच सामन्यात नाबाद ४० धावांची खेळी करणारा बेअरस्टो २ स्थानाच्या सुधारणेसह १४व्या स्थानी पोहोचला आहे. या क्रमवारीत ८९४ गुणांसह डेविड मलान पहिल्या स्थानी आहे.

हेही वाचा -Ind Vs Eng ३rd T-२० : इंग्लंडचा भारतावर ८ गडी राखून विजय, बटलरची वादळी खेळी

हेही वाचा -इशान किशनच्या आई-वडिलांशी 'ईटीव्ही भारत'ची खास बातचित

Last Updated : Mar 17, 2021, 5:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details