लंडन - भारत विरुध्द पाकिस्तानचा 'महामुकाबला' उद्या रविवारी रंगणार आहे. या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत भारताचा कर्णधार विराट कोहली यानं आपला 'गेम प्लान' सांगितला. आम्ही या सामन्यात परिस्थिती पाहून गोलंदाजीचा क्रम ठरवू, अतिरिक्त वेगवान गोलंदाजाचा पर्याय असल्यास आम्ही त्याचाही विचार करु असं सांगितलं आहे. यामुळं हा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.
पाकला पराभवाची धूळ चारण्यासाठी 'गेम प्लान' ठरला; अशी असेल 'विराट' खेळी - game plane
सामन्यात परिस्थिती पाहून गोलंदाजीचा क्रम ठरवू, अतिरिक्त वेगवान गोलंदाजाचा पर्याय असल्यास आम्ही त्याचाही विचार करु असं कर्णधार विराट कोहलीने सांगितलं आहे.
पत्रकारांनी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याच्याविरोधात काही गेम प्लान ठरवलं का असं विचारलं असता विराट म्हणाला, प्रत्येक फलंदाजाला गोलंदाजाच्या ताकदीची जाणीव असायला हवी, मी फक्त आमिर विरुध्द लक्ष केंद्रीत करत नसून प्रत्येक गोलंदाजाविरुध्द धावा करण्यास सक्षम राहण्यासाठीचा विश्वास निर्माण करत आहे. सध्या ड्रेसिंग रुममधील वातावरण मागे झालेल्या सामन्याप्रमाणे असून आम्हाला आमच्या भक्कम बाजू ओळखून खेळ करण्याची गरज असल्याचं त्यानं सांगितलं.
भारत आणि पाकिस्तान संघामध्ये आयसीसी चॅम्पियन स्पर्धेमध्ये सामना झाला. या सामन्यामध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने शिखर धवन, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे बळी घेतले होते. यामुळं या सामन्यात भारताला १८० धावांनी पराभवाला समोरे जावं लागलं होतं. त्यानंतर आमिरचा 'फॉर्म' राहिला नाही. मात्र, ऑस्ट्रेलिया विरुध्द झालेल्या सामन्यात त्यानं ५ विकेट घेत आपली छाप सोडली आहे.