चेन्नई -यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेतून भारताचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकरला दुखापतीमुळे बाहेर पडावे लागले होते. त्याने या स्पर्धेत पहिल्याच चेंडूवर फलंदाजाला बाद करण्याची किमया केली होती. आता शंकरने त्याच पराक्रमाची पुनरावृत्ती केली आहे.
सध्या सुरू असलेल्या तामिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धेतून शंकरने क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन केले. शंकरने चेपॉक सुपर गिलीज संघाकडून खेळताना आपल्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर फलंदाज आकाश सिवानला बाद करत मोठा धक्का दिला. या सामन्यात शंकरने दोन बळी घेतले आहेत.