मुंबई - भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू विजय शंकर विवाहबंधनात अडकला आहे. त्याने वैशाली विश्वेश्वरनसोबत बुधवारी (ता. २७) लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला विजय आणि वैशाली यांच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्र परिवार उपस्थित होता. दोघांनी पारंपारिक पद्धतीने लग्न केले. विजयच्या लग्नाचे फोटो आयपीएलमधील संघ सनरायझर्स हैदराबादने शेअर केले आहेत.
विजय आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचा सदस्य आहे. यामुळे त्याच्या लग्नातील फोटो शेअर करत सनरायझर्सने शुभेच्छा दिल्या आहेत. आम्ही विजय शंकरला त्याच्या आयुष्यातील खास दिवसाबद्दल शुभेच्छा देतो. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी रहावे, अशा शुभेच्छा, सनरायझर्सने दिल्या आहेत. दरम्यान, विजयने मागील वर्षी ऑगस्टमध्ये वैशालीबरोबर साखरपुडा केला होता.