मुंबई - बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आगामी विजय हजारे करंडक 2021 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार 20 फेब्रुवारी ते 14 मार्चपर्यंत ही स्पर्धा रंगणार असून स्पर्धेचा अंतिम सामना 14 मार्चला खेळवण्यात येणार आहे. एकूण 38 संघ विजेतेपदासाठी एकमेकांशी भिडणार आहेत.
दरम्यान, एकूण 38 संघाची विभागणी 5 एलीट आणि 1 प्लेट अशा एकूण 6 ग्रुपमध्ये करण्यात आली आहे. या स्पर्धेतील सामन्याचे आयोजन जयपूर, सुरत, इंदूर, बंगळुरु, कोलकाता आणि तमिळनाडूमध्ये करण्यात आले आहे.
खेळाडूंची होणार कोरोना चाचणी
कोरोना संसर्गामुळे बीसीसीआय खेळाडूंसाठी गाइडलाइन तयार केले आहे. यानुसार सर्व संघ या स्पर्धेतील सामन्याच्या ठिकाणी पोहचल्यानंतर त्यांची एकूण 3 वेळा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. या कोरोना चाचणी 1 दिवसाआड करण्यात येणार आहेत. चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
असे आहे स्पर्धेसाठी ग्रुपनिहाय संघ
एलीट ए ग्रुप-
संघ - गुजरात, छत्तीसगड, हैदराबाद, त्रिपुरा, बडोदा आणि गोवा
ठिकाण - सुरत
एलीट बी ग्रुप-
संघ - तमिळनाडू, पंजाब, झारखंड, मध्य प्रदेश, विदर्भ, आंध्र प्रदेश
ठिकाण -इंदूर