मुंबई -देशातील सहा जैव-सुरक्षित वातावरणात आजपासून (२० फेब्रुवारी) विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. १४ मार्चपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत अनेक स्टार खेळाडू खेळताना दिसतील. एकूण ३८ संघ विजेतेपदासाठी एकमेकांशी भिडणार आहेत. दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर असलेले भुवनेश्वर कुमार, श्रेयस अय्यर आणि शिखर धवन यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
हेही वाचा -देशासाठी न खेळता शाकिब खेळणार आयपीएल!
या संघाची विभागणी ५ एलीट आणि १ प्लेट अशा एकूण ६ ग्रुपमध्ये करण्यात आली आहे. या स्पर्धेतील सामन्याचे आयोजन जयपूर, सुरत, इंदूर, बंगळुरु, कोलकाता आणि तामिळनाडूमध्ये करण्यात आले आहे.
संघांची विभागणी -
एलीट ए ग्रुप -
संघ - गुजरात, छत्तीसगड, हैदराबाद, त्रिपुरा, बडोदा आणि गोवा
ठिकाण - सुरत
एलीट बी ग्रुप -
संघ - तमिळनाडू, पंजाब, झारखंड, मध्य प्रदेश, विदर्भ, आंध्र प्रदेश
ठिकाण -इंदूर
एलीट सी ग्रुप -