दिल्ली - विजय हजारे करंडक स्पर्धेत उत्तर प्रदेश संघाने गुजरातचा ५ गडी राखून पराभव करत, अंतिम फेरीत धडक दिली आहे. उपांत्य सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना ४८.१ षटकात १८४ धावा केल्या होत्या. हा सामना उत्तर प्रदेशने ४२.४ षटकात ५ गड्याच्या मोबदल्यात सहज जिंकला.
गुजरातचा कर्णधार प्रियम पांचाळ याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय अंगलट आला. उत्तर प्रदेशच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत गुजरातला १८४ धावात रोखले. हेत पटेल याने सर्वाधिक ६० धावांची खेळी केली. तर यश दायलने उत्तर प्रदेशसाठी सर्वाधिक ३ गडी बाद केले. त्याला अकिब खानने २ गडी बाद करत चांगली साथ दिली.